ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील पदांकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित
अंतिम मुदत 27 मे पर्यंत

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या आस्थापनेवरील शासकिय आश्रमशाळा व वसतीगृहातील (गट-ड) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 478 चौकीदार पदाकरीता जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्याअन्वये सदर पदभरतीबाबत https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी 6 मे 2026 पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे 2026 आहे.
जास्तीत जास्त पात्र उमेदावारांनी अर्ज भरावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.



