ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा येथे मक्का खरेदीस सुरुवात ; मुनगंटीवार साहेबांचे आभार

रवी मारपल्लीवार अध्यक्ष बाजार समिती पोंभुर्णा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मक्का खरेदीचा प्रश्न गंभीर बनला होता. शेतात व घरी ठेवलेला मक्का खराब होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. याबाबत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली होती.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी संबंधित मंत्री व विभागाकडे तात्काळ पाठपुरावा करून मक्का खरेदी केंद्राला मंजुरी मिळवून दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त होताच पोंभुर्णा बाजार समितीमार्फत शासकीय गोदाम येथे मक्का खरेदीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी बाजार समितीचे सभापती रवीभाऊ मारपल्लीवार यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. तसेच ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकरी निकेश दुऊरमल्ले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि प्रत्यक्ष मक्का खरेदी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मक्का लागवड करण्यात आली असून खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कार्यक्रमाला बाजार समिती सभापती रवींद्र मारपल्लीवार, माजी सभापती अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पीपरे, हरीश धवस, नैलेश चिंचोलकर, राकेश गव्हारे, रवींद्र गेडाम, सचिव लीलाधर बुरांडे, विनोद देशमुख, गुरुदास पीपरे, ऋषी कोटरंगे, बंडू बुरांडे, रोशन ठेंगणे, लक्ष्मण ठेंगणे, विकास दिवसे, राजू ठाकरे तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये