अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मातृत्व लादणाऱ्या आरोपीस पोक्सो कायद्यानुसार २० वर्षाचा कारावास व २० हजार रुपये दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा येथील मा. जिल्हा न्यायाधीश -3 वर्धा श्री सतिश गो.अडके साहेब यांनी आरोपी नामे राजकुमार विनायक कासार वय 23 वर्ष राहणार रामपर तालुका आर्वी जिल्हा वर्धा यास कलम 376(2)(एन) भादवी व पोक्सो कायद्या अंतर्गत नुसार 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 20,000/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा तसेच कलम 4 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 नुसार 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रक्कम 5,000/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली नाही.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की, आरोपी नामे राजकुमार विनायक कासार याने पिडीत हिचं सोबत जानेवारी 2021 मध्ये सावंगी जवळ असलेल्या घुबडटोली जंगल परिसरात पिडीतेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच यानंतर आठ ते दहा वेळा लग्नाचे आमिष देऊन आरोपीने पुन्हा शरीरसंबंध तयार केले पिडीतेला शारीरिक त्रास झाल्याने पिडीतेच्या आईने पिडीतेला खासगी रुग्णालयात नेऊन तपासले असता पिडीत हि गरोदर असल्याचे सांगितले पिडीतेच्या आईने पिडीतेला विचारणा केली असता पिडीत हिने आपल्या आईला घडलेल्या संपूर्ण प्रकार सांगितला व तसेच आरोपी यांने जबरदस्ती करून व लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्याच्यापासून 7 महिन्यांची गर्भवती आहे असे सांगितले घडलेल्या संपूर्ण प्रकार पिडीत हिने तिच्या आईला सांगितले व त्यावरुन पिडीत हिच्या आईने पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिल्याने कलम 376(3)376,(2) (एन) भादवी व कलम 6, 8, पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन आर्वी येथील महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अपराध क्रमांक 919/2021 नुसार दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
सरकार तर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्री.विनय आर. घुडे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले त्यांना पैरवी अधिकारी पोलिस हवालदार राजेश बाळापुरे बं.नं.1304 पोलिस स्टेशन आर्वी यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात शासनातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासले पिडीता व पिडीतांची आई वैद्यकीय अधिकारी रासायनिक विश्लेषक अधिकारी व इतर साक्षदार यांची साक्ष व अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री विनय आर.घुडे यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरुन आणि सदर प्रकरणात पिडितेला जे बाळ झाले त्या बाळाचे वडील आरोपी असल्याचे डी.एन.ए. रिपोर्ट विद्यमान कोर्टाने ग्राह्य धरून मा. जिल्हा न्यायाधीश -3 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा श्री सतिश गो.अडके साहेब यांनी आरोपीस दिनांक 06/05/2026 रोजी वरील प्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली आहे.



