Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोविंद पेदेवाड यांना मिळाला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : शिक्षक दिना निमित्त चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणारे तथा अध्यापनात अभिनव पद्धतीचा वापर करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे उपक्रमशील शिक्षक गोविंद भाऊराव पेदेवाड यांना सन -२०२४-२०२५ चा चंद्रपूर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .

         सन -२०१८ पासून शाळेवर कार्यरत असलेले गोविंद पेदेवाड यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर शाळेचा कायापालट केला . या शिक्षकाची धडपड वाखाण्याजोगी आहे. गावच्या शाळेत शिकणारी सर्व मुले आदिवासी, शेतकरी व शेतमजुराची आहेत. पेदेवाड यांनी पालक संपर्क वाढवून शिक्षणाची गोडी निर्माण केली. मिरची तोड,स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. लोकसहभागातून शाळेची आकर्षक रंगरंगोटी करून भिंती व परिसर बोलका केला. तसेच शाळेचे वातावरण आनंददायी करून शैक्षणिक साहित्य ,पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर त्यांनी भर दिला. शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत शैक्षणिक ,सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रात ही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या रूपाने माझ्या कामाची दखल प्रशासनाकडून घेतली गेल्याचा आनंद आहे अशी भावना त्यांनी व्यक्त करत पटसंख्या व गुणवत्ता वाढ हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगितले .

          पुरस्कार वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष व उद्घाटक म्हणून नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले ,प्रमुख पाहूणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरिश धायगुडे,शिक्षणाधिकारी (प्राथ.)अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी (माध्य.)निकिता ठाकरे,उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख,निवास कांबळे तथा शिक्षण विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये