दि लिटल फ्लॉवर स्कुलचा उत्कृष्ट निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– दि पब्लिक एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित दि लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कुल नगीना बाग चंद्रपूर चा दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी चा निकाल उत्कृष्ट ठरला. या शाळेतून दहावी च्या परीक्षेत
35 विद्यार्थी बसले होते 13 विध्यार्थी उत्कृष्ट श्रेणित पास झाले. यात अय्यान सरमते 89.60%, कृष्णा कलोडे 87.20%, उमेरा बेग 83.60%, अमन लोणबळे 83%, दृष्टी इंगोले 82.60%, यशश्री जगणवार 81.60%, पियुष भगत 81.60%, दारिम उजमा 80% टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणित 10, द्वितीय श्रेणित 7 पास ग्रेड मध्ये 4 असे 34 विध्यार्थी पास झाले. या सर्व विध्यार्थ्यांचे अध्यक्षा प्रेमीला गुलाबराव दुबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ गोसावी, सचिव ममता घोडेस्वार, राकेश दुबे, मुख्यध्यापिका मीनाक्षी मून, शिक्षक रेहाना शेख, अरुणा शेंडे, संजीवनी मून, सरोज महाजन, रुकसार शेख या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात.



