ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मनपात महाराष्ट्र दिन साजरा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार १ मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    याप्रसंगी आयुक्तांनी सर्व अधिकारी,कर्मचारी व शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच शहराच्या विकासाकरीता राबणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्राचे राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात येऊन महाराष्ट्राची गौरव गिते वाजविण्यात आली.

     याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव,स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, मनपाचे मनपा आयुक्त अकुनुरी नरेश,उपायुक्त संदीप चिद्रवार, उपायुक्त शेषराव टाले, सर्व पदाधिकारी,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, नरेंद्र बोबाटे,डॉ.अमोल शेळके यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये