ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशोधन विहारवरील आरोपांचे सत्य काय? – टॅक्स चोरी बाबत संभ्रमाचे वातावरण

प्रशासनाने सत्य समोर आणावे नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

प्रा. अशोक डोईफोडे, गडचांदुर

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाच्या अंतर्गत नांदाफाटा येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी निवासी वसाहत यशोधन विहार ह्या नावाने  पी एम इन्फ्रावेंचर कंपनीद्वारे निर्माण करण्यात येत आहे. सदर कंपनीने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या टॅक्सची चोरी केल्याचा आरोप मारोती बुडे ह्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला असुन यासंदर्भात गट विकास अधिकारी, कोरपना ह्यांना तक्रार देण्यात आली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरु असुन यासंदर्भात चांदा ब्लास्ट न्युज पोर्टलवर मारोती बुडे ह्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या आधारे बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.

मात्र यशोधन विहारच्या संचालकांनी सदर टॅक्स चोरीचे खंडन केले असुन सदर आरोप बिनबुडाचे आहेत असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आपली बाजु स्पष्ट करताना त्यांनी संबधित जमीन 15 डिसेंबर 2022 रोजी अकृषक झाली असल्याचे सांगितले असुन त्यामुळे मागील चार ते पाच वर्षांपासून टॅक्स चोरी होत असल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे संबंधित संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून प्रशासनाने सत्य बाहेर आणावे अशी मागणी होत आहे.

सदर कंपनी विरुद्ध गट विकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली तक्रार व मारोती बुडे ह्यांचे प्रसिद्धी पत्रकानुसार  चांदा ब्लास्ट न्युज पोर्टल वर बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या संदर्भात सदर कंपनीच्या संचालकांची प्रतिक्रिया घेण्याचे अनावधानाने राहुन गेले मात्र त्यांनी स्वतः दिलेल्या स्पष्टीकरणानुसार प्रकारात संभ्रम निर्माण होत असुन यासंदर्भात संबंधित कंपनीची बदनामी अथवा नुकसान करण्याचा चांदा ब्लास्टचा कुठलही उद्देश नसुन संबधित कंपनीच्या संचालकांची प्रतिक्रिया घेण्यात न आल्याबद्दल चांदा ब्लास्ट दिलगीर आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये