आदिवासी सहकारी संस्थेवर गोंडवाना चळवळ व भाजपाची सत्ता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, पोंभुर्णा येथे पहिल्यांदाच गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे.
दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सहायक निबंधक कार्यालय, पोंभुर्णा येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी राजेंद्र कुळमेथे तर उपाध्यक्षपदी बालाजी पेंदोर यांची अविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी संचालक ईश्वर नैताम, दिलीप मॅकलवार, श्रीकांत वडस्कर, निमचंद्र कोवे, विस्तारी टेकाम, चतुर ऊईके यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. निवडणूक चुरशीची असली तरी ती शांततेत पार पडली.
नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळीचे जगण येलके महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरिवार, माजी जि.प. सदस्य राहुल संतोषवार, नंदकिशोर तुम्मुलवार, माजी जि.प. अध्यक्ष संतोष कुभंरे, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, अजय लोणारे आदींनी अभिनंदन केले आहे.



