ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढोलीत बसस्थानकावर कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली बसस्थानक परिसरात सोमवारी (दि. २०) दुपारी सुमारे १.०० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात रामा बुटले नामक पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भरधाव वेगात असणाऱ्या एम.एच._३४. सी.जे._७९९९ क्रमांकाच्या कारने वढोली येथील रामा विठोबा बुटले (वय ५५) या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. ही कार येथील उद्योजक अनिल सुरकर यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे.धडकेमुळे रामा बुटले हे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारासाठी नेत असताना बल्लारपूर जवळ दुपारी सुमारे ३.०० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे वढोली परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृतक रामा बुटले यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये