सुकवासीत आज समाज प्रबोधन कार्यक्रम
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज मंडळ व फुले, शाहू आंबेडकर युवा विचार मंडळ सुकवासी ( ता. गोंडपिपरी ) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव आज (११ एप्रिल) रोज शनिवारला, सायंकाळी ७.०० वाजता संपन्न होणार असून सप्त खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार संघपाल महाराज पवनुरकर यांचा समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माळी समाज सेवा संघाचे जिल्हा संघटक सत्यशोधक बळीराज निकोडे, ॲड. अक्षय उराडे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल चौधरी तर उद्घाटक ओम लेणगुरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून विलास निमगडे पोलिस पाटील, चंदू बारसागडे, सुदर्शन भसारकर, विकास वेलादि, प्रमोद पेंदोर, संदीप शेंडे, शिक्षकवृंद बावणे, मेंढे, अनुराधा चौधरी, सुनंदा वेलादी, कल्पना निकोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
मार्गदर्शन कार्यक्रमानंतर सत्यपाल महाराज यांचे शिष्य, सप्त खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार संघपाल महाराज पवनुरकर यांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल रवींद्र चौधरी ही बालिका करणार आहे. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज समन्वय कृती समितीचे अध्यक्ष अतुल चौधरी, उपाध्यक्ष छत्रपती आदे, सचिव बंडू मीहूर्ले यांच्यासह माळी समाज, बौद्ध समाज, आदिवासी समाज यांच्यावतीने करण्यात आले आहे.


