आज नवेगाव मोरे येथे महाराजस्व समाधान शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- ग्रामीण भागातील नागरिकांचे महसुली प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तहसिल कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील नवेगाव मोरे येथे दि.१० एप्रिलला ग्रामपंचायत सभागृहात महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८ अ उतारे वितरण, संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वितरण, रेशन कार्ड, ॲग्रीस्टॅक योजना, आरोग्य शिबीर आदी प्रशासकीय कामांचे निराकरण करण्यात येणार आहे.नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी केले आहे.


