ग्रामीण रुग्णालयात पाणपोईचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा :_ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रुग्णांच्या सेवेसाठी पाणपोई सुरू करण्यात आली. एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यात कडाक्याचे ऊन पडत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना थंड पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासते. हीच गरज ओळखून पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज रुग्णांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार असून, उन्हाच्या तीव्रतेतही थंड पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
यावेळी अल्का आत्राम, हरीश ढवस, सुलभा पीपरे, अजित मंगळगिरीवार, डॉ. किन्नाके, विनोद देशमुख, गुरुदास पीपरे, ऋषी कोटरंगे, अजय मस्के, वैशाली बोलमवार, ईश्वर नैताम, बंडू बुरांडे, रोशन ठेंगणे, दर्शन गोरंटीवार, नैलेश चिंचोलकर, रवींद्र गेडाम, राकेश गव्हारे, दिलीप मॅकलवार, नंदा कोतरंगे, उषा गोरंतवार, रजिया कुरेशी, सुनीता मॅकलवार, हिना बिश्वास, अरुण कुत्तारमारे, प्रवीण चिंचघरे, जितेंद्र चौधरी, अविनाश ढोंगे, विजय वासेकर, शिवम ओडेलवार आदी उपस्थित होते.



