ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद क्षेत्रात मोकाट जनावराचा वावर, अपघात होण्याची दाट शक्यता

नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावराचा बंदोबस्त करावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभिड :_ नगर परिषद क्षेत्रात मोकाट जनावराचा वावर असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यामुळे नगर परिषद प्रशासनाने जनावराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

नागभिड नगर परिषद क्षेत्रातून गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर राष्ट्रीय महामार्ग जात असून अनेक मोकाट जनावरे रस्त्यावर,बसून, उभे राहत असतात, काही ठिकाणी दुभाजक असल्याने वाहने हळू चालविली जातात मात्र ज्या ठिकाणी दुभाजक नाही त्या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने जात असल्याने जनावराचा अपघात होतो आणि सोबत वाहन धारकांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. नागभिड नगर परिषद क्षेत्रातील राममंदिर चौक, टी पॉईंट, कृषी उत्पन्न बाजार परिसरात मोकाट जनावरे उभे, बसून राहत असल्याने वाहन चालकांना दिसत नाही यामुळे अनेक जनावरे रस्त्यावर मरण पावली आहेत तरीपण नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावराचा वावर होणार नाही यासाठी योग्य ती कार्यवाही करून मोकाट जनावराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये