ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खाजगी शाळांच्या नफेखोरीविरोधात कडक कायद्याची मागणी

काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे याच्या नेतृत्वात निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती येथील प्रभाग क्र.१२ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक अनिल शामराव पडोळे यांनी खाजगी शाळांकडून होत असलेल्या शैक्षणिक साहित्याच्या नफेखोरीविरोधात कडक व पारदर्शक कायदा लागू करण्याची मागणी करत शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर केले.

सदर निवेदन पंचायत समिती भद्रावती येथील गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) यांच्या मार्फत सादर करण्यात आले. या निवेदनात खाजगी शाळांकडून पालकांवर टाकल्या जाणाऱ्या आर्थिक बोजाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोणत्याही शाळेला पुस्तके, वह्या, गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य यांची थेट किंवा अप्रत्यक्ष विक्री करण्यास बंदी घालावी. शाळांनी आवश्यक शैक्षणिक साहित्याची यादी किमान ३० दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, एकाच वर्गासाठी निश्चित करण्यात आलेली पाठ्यपुस्तके किमान ३ ते ५ वर्षांपर्यंत बदलण्यास मनाई करावी. पालकांना कोणत्याही अधिकृत विक्रेत्याकडून किंवा खुल्या बाजारातून साहित्य खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, यावरही भर देण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच त्यांची मान्यता रद्द करण्याची तरतूद कायद्यात असावी. याशिवाय जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करून पालकांच्या तक्रारींवर तातडीने निर्णय घेण्याची यंत्रणा उभारावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण क्षेत्रातील वाढते व्यापारीकरण थांबवून पारदर्शक व विद्यार्थीहिताचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत.

या निवेदनावेळी नगरसेवक अनिल पडोळे यांच्यासह शहर प्रमुख सुरजाऊ गावंडे, नगरसेवक सुनील नामोजवार, प्रथम गेडाम, उषा जाधव व रितेश वाढई आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये