ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जंगल क्षेत्रात मोहफूल हंगाम सुरू अकाली पावसाचा फटका   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलव्याप्त क्षेत्रामध्ये व दुर्गम आदिवासी भागात शेती शिवारात मोठ्या प्रमाणात मोह फुलाची झाडे मोह फुलांनी उगवलेली आहे वन उपज आदिवासी भागातील आहारामध्ये मोठे महत्त्व असलेलं मोहाचे उत्पादन आहे मोह फुलापासून भाकर लाडू याबरोबर मोहाची दारू देखील काढल्या जाते दुर्गम अशी वासी भागातील जंगल क्षेत्रामध्ये अनेक शेतमजुरांना या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो त्याचबरोबर आहारामध्ये याचा वापर होत असल्यामुळे सकाळी सकाळी गावातील महिला पुरुष जंगलाकडे व शेती शिवारात असलेल्या मोह झाडाकडे जाऊन व फुले वेचणी करतात यामुळे उन्हाळ्याच्या हंगाम महिना भर रोजगार उपलब्ध होऊन वर्ष भर पुरेल असा मोह फुले साठवून आहारा मध्ये उपयोग केल्या जाते.

यामुळे आरोग्यदायी व शरीरासाठी उपयुक्त आहार म्हणून उपयोग केल्या जातो आदिवासी व कोलाम पोळावर मोहफूल गोळा करण्याची लगभग सुरु असून वन उपजावर अनेक कुटूंबांना राजेगारातून आर्थिक लाभ होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात असून मोहफूला नंतर मोहापासून टोळी व तेंदू पानाचा हंगाम सुरू होतो मात्र अवकाळी वादळ पावसाने उत्पादन घटून रोजगार ला फटका बसत आहे कोलाम पोळावर मोहफुला ग्रेंडींग करताना कोलाम समूह

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये