ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्वाजल्य देशभक्तीचे प्रतीक, भारतीय सेना – राहुल पावडे

भाजपाने केले शाहिदांना अभिवादन - कारगिल विजयदिनाचे औचित्य

चांदा ब्लास्ट

जगात सर्वात जास्त बलशाली आपली सेना आहे.प्रत्येक सैनिक प्राणाची आहुती देण्यास नेहमी तत्पर असतो.आपल्या सेने जवळ आत्मविश्वासाचे मोठे शस्त्र आहे.म्हणूनच पाकिस्तान व चीनला नेहमी तोंडघाशी पडावे लागते.आपली सेना ज्वाजल्य देशभक्तीचे प्रतीक आहे.या सर्व सैनिकांना नेहमी नमन केले पाहिजे.ही सेना देशभक्त असल्यानेच आपण सुरक्षित आहो.कारगिल युद्धात शाहिद झालेल्या सर्व सैनिकांना मी अभिवादन करतो,असे प्रतिपादन नवनियुक्त भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी केले.
ते,ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जटपुरा गेट कारगिल विजय दिवसानिमित्य  आयोजित ‘शाहिदांना अभिवादन’ सभेत बुधवारी 26 जुलैला बोलत होते.

यावेळी भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद कडू, ज्येष्ठ नेते विजय राऊत, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार सोम,शासकीय अभियांत्रिकी समिती अध्यक्ष  रामपाल सिंह,राजेंद्र खांडेकर,अरुण तीखे,राहुल घोटेकर,अजय सरकार,शिला चव्हाण,वंदना तिखे,शीतल गुरनुले,मयाताई उईके, मोनीषा महातव,किरण बुटले,सुनीता जैस्वाल,अर्चना बांबोले,विठ्ठल डुकरे,दिनकर सोमलकर,सचिन कोतपल्लिवार,रवी लोणकर,रवी चाहारे,धम्मप्रकाश भस्मे, चांद सय्यद,पुरुषोत्तम सहारे, आमीन शेख,धनराज कोवे,सुरेश हरिरमानी,संजय निखारे,सुनील डोंगरे,सत्यम गाणार,महेश झिटे,बलराम शाह,बिबी सिंह,गिरीश गुप्ता,संदीप देशपांडे,चंदन पाल,बंडू गौरकार, रामकुमार अकापेल्लीवार,गणेश रासपायले,सूरज सिंह,आकाश ठूसे,आकाश मस्के,राजेश यादव,प्रवीण गुर्रमवार,विशाल गुप्ता,संदीप सदभैये,गोपाला जोशी,गुड्डू यादव,शिवम सिंग,अमोल चौधरी,जितेश पाल,विक्की मेश्राम,प्रीतम कारेकर,सुशांत आकेवार,बाळकृष्ण मनुसमारे,प्रवीण यादव,महेश कोलावार यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मौन धारण करून शाहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
पावडे पुढे म्हणाले,1999 ला झालेले कारगिल युद्ध 45 दिवस चालले.यात 550 सैनिकांनीं प्राणाची आहुती दिली.एकीकडे विजयाचा आनंद आहे तर दुसरीकडे शेकडो सैनिकांना शाहिद व्हावे लागले याचे दुःखही आहे.भारतीय सेनेचे भारतमातेवरील प्रेम अद्वितीय आहे.कोणत्याही वातावरणात लढण्याची क्षमता सैनिकांची असल्याने,सारे भारतीय सुरक्षित आहो. असे ते म्हणाले.मोदी सरकारच्या काळात, अत्याधुनिक शस्त्रसाहित्य मिळाल्याने सेना आणखी सक्षम झाली.असे ते म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये