ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हनुमान जयंतीनिमित्त आ. जोरगेवार यांची शहरातील विविध मंदिरांना भेट

चांदा ब्लास्ट

हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध हणुमान मंदिरामध्ये भेट देत दर्शन घेतले.

  प्रभू श्री हनुमान यांच्या जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भजन-कीर्तन, नामस्मरण, महाप्रसाद वितरण आणि विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा माहोल निर्माण झाला होता.

   या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध हनुमान मंदिरांना भेट देत प्रभू श्री हनुमानाचे दर्शन घेतले. प्रत्येक मंदिरात त्यांनी विधिवत पूजाअर्चा करत शहराच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिरांमध्ये उपस्थित असलेल्या भाविकांशी त् संवाद साधला

  यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, “भगवान हनुमान हे शक्ती, श्रद्धा, निष्ठा आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून आपल्याला समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करणे आवश्यक आहे.

  मंदिर भेटीदरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी चालू असलेल्या भजन-कीर्तन कार्यक्रमांमध्ये काही वेळ उपस्थित राहून सहभागी घेतला. काही ठिकाणी त्यांनी महाप्रसादाचेही वितरण केले, यावेळी उपस्थित भाविकांनी त्यांचे विशेष स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये