गोंडपिपरीचा ‘महिला महोत्सव’ म्हणजे नारी शक्तीच्या चैतन्याचा जागर – आमदार सुधीर मुनगंटीवार
आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने महिलांच्या कलाविष्काराला मिळाले नवे व्यासपीठ.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महिलांच्या हातांमध्ये केवळ संसाराची दोरी नसून, समाज आणि राष्ट्र घडवण्याची विलक्षण शक्ती आहे. गोंडपिपरी येथील हा महिला महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ग्रामीण भागातील भगिनींच्या सुप्त गुणांना दिलेली फुंकर आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काढले. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून गोंडपिपरी येथे (दि.२८) ‘महिला महोत्सव २०२६’ चे अत्यंत दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, “आजची स्त्री विज्ञानाच्या युगात भरारी घेत असतानाच आपली संस्कृती आणि परंपराही जपत आहे. राजुरा मतदारसंघातील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांच्यातील कलाकाराला दाद देणे, हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार देवराव भोंगळे म्हणाले की,आमचा सांस्कृतिक महिला महोत्सव हा प्रत्येक भगिनीच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारा सोहळा आहे. गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि कलाकौशल्य दडलेले आहे, राजुरा विधानसभा मतदारसंघातील माझी प्रत्येक भगिनी ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावी, हेच आमचे स्वप्न आहे. या महोत्सवातून मिळणारा आत्मविश्वास त्यांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नवी भरारी देईल, याची मला खात्री आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून निर्माण झालेली एकजूट ही भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी एकल आणि सामूहिक नृत्यातून गोंडपिपरीच्या लाडक्या बहिणींच्या प्रतिभेचे दर्शन घडले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांनी केले.
याप्रसंगी सौ.अर्चना भोंगळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार,शहराध्यक्ष चेतनसिंह गौर,नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्वाती वडपल्लीवार, शहराध्यक्षा अरुणा जांभूळकर,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुन, सुहास माडुरवार, निलेश संगमवार, गणेश मेरूगवार, मनोज वनकर, वैभव बोनगीरवार, स्वप्निल अनमुलवार, सतीश वासमवार भानेश येग्गेवार, राहुल चौधरी प्रज्वल बोबाटे, पंकज चिलणकर, वैष्णवी बोडलावर, जया सातपुते, रोशनी अनमूलवार, शारदा गरपल्लीवार, कलावती पुप्पलवार, सुरेखा पिपरे, सुरेखा श्रीकोंडावार, सुनीता येग्गेवार, मनीषा दुर्योधन, रंजना रामगिरवार, वनिता देवगडे, शारदा गरपल्लीवर, कोमल फरकडे, अनुजा बोनगीरवार, मनीषा मडावी, माया वाघाडे, शुभांगी वनकर, भारती साखलवार, अस्मिता राफलवार, तेजस्विनी भगत, शैलेश विश्वकर्मा, गुड्डू चौधरी, रोहित भगत यांच्यासह गोंडपिपरी तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



