ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथ्रीकर यांचा सत्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अ. भा.लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ अकोला,तर्फे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील कर्तबगार, महिलांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष.मा. संजय देशमुख यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अण्णासाहेब रोकडे सभागृहात हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी देविकाताई देशमुख उपाख्य माई ह्या होत्या तर. प्रमुख पाहुणे म्हणून सीमाताई झावरे, मायाताई इरतकर, संजय देशमुख, मंदाताई देशमुख उपस्थित होत्या,यावेळी सेवानिवृत्त प्राचार्या सौ. प्रतिभा पाथ्रीकर यांना सन्मानित करण्यात आले. संचालन जया भारती- इंगोलेयांनी केले. कार्यक्रमाला गणमान्य महिला उपस्थित होत्या, सत्कारमूर्ती महिलांचे अभिनंदन करण्यात आले.



