ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेजापूर वासियांतर्फे ॲड.राजेंद्र जेनेकर सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       ग्रामपंचायत तेजापूर चे वतीने रामनवमी उत्सव आणि विदेही संत श्री जगन्नाथबाबा यांच्या सोळा फुट मुर्तीच्या अनावरणाचा भव्य कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने तेजापूर घाटावर आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी समाजातील वेगवेगळ्या भागात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्त्वप्रणालीचा राजुरा, कोरपना आणि तेलंगण भागात स्वयंस्फूर्त प्रचार प्रसार करणारे व्यक्तिमत्व म्हणून ॲड.राजेंद्र जेनेकर यांचा आयोजन समितीने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.विठ्ठलराव मालेकर आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार ग्राम. विठ्ठल डाखरे महाराज यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य डॉ. प्रा. श्रावण बानासुरे , तेजापूर च्या सरपंच सौ.चंद्रभागाताई सहारे , उपसरपंच आशिष मालेकर ,मनोज मालेकर, वरारकर गुरुजी आदींची विशेष उपस्थिती होती. सत्कारमुर्ती ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला ग्राम परिवर्तनवादी विचार,तत्वज्ञान,साहित्य सर्वदूर जाण्याकरीता श्रीगुरुदेव सेवा माध्यमातून कशा प्रकारे कार्य केले यासंबंधी विचार व्यक्त करून आयोजन समितीस धन्यवाद दिले. प्रस्तावना आणि सत्कार मूर्तींचा परिचय म्हणून डाखरे महाराज यांनी विचार प्रकट केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. जेनेकर यांचे राजुरा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी लटारु मत्ते गुरूजी,नगरसेवाधिकारी बळीराम पाटील बोबडे,प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे,उपाध्यक्ष विनायक सोयाम, संघटक मनोहर बोबडे,सचिव मनोहर पासपुते,युवक प्रमुख गजानन बोबडे,प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे,अनिल पिदूरकर,शामसुंदर कारेकर,तुळशीराम धानोरकर,रविंद्र वांढरे,केशव रासेकर,कोषाध्यक्ष रमेश गौरकर,भाऊराव बोबडे,रमेश धानोरकर,वामन देवतळे,विश्वास सूर,विनायक साळवे,उमेश कडू,मुन्ना चुधरी,बाबा लेडांगे आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये