ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्सव साजरा
भव्य शोभायात्रा काढण्यात आली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे माळीपुरा व वाल्मीक नगर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माळीपुरा येथील श्रीराम मंदिरातून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ट्रॅक्टर वरील विराजमान श्रीराम ची भव्य मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गाने वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली, शोभायात्रा मध्ये राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शोभायात्रा चे आयोजन श्रीराम भक्त व सकल हिंदू समाजाने केले होते, शोभायात्रा चे विसर्जन चौंडेश्वरी मंदिर येथे करण्यात आले, महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शांतता व सुव्यवस्था साठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.



