ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरीत प्रभू श्रीरामाच्या जयघोषात भव्य शोभायात्रा संपन्न

विविध देखाव्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

स्थानिक ‘श्रीराम मंदिर, जाणी वार्ड’ येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही २६ मार्च रोजी श्रीराम नवमीच्या निमित्ताने भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवत ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर दुमदुमून टाकले.

आकर्षक देखावे आणि सांस्कृतिक वैभव शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध संस्थांनी सादर केलेले नयनरम्य देखावे होते.

यात प्रामुख्याने खालील मंडळांचा सहभाग होता:

रा. स्व. संघ, ब्रह्मपुरी नगर: शिस्तबद्ध संचलन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश.

स्वामी विवेकानंद संस्कार वर्ग व चातुर्मास उत्सव समिती : भगवान विष्णुचे दहा अवतार देखावा.

शिवजयंती उत्सव समिती तर्फे नाद ब्रम्हा आर्केस्टा लाईव्ह गाण्याचे ब्रह्माकुमारी केंद्र: शांती आणि आध्यात्मिकतेचा संदेश देणारी कलाकृती.

राजस्थानी समाज युवा मंडळ: आपल्या पारंपरिक वेशभूषेसह सादर केलेले आकर्षक देखावे.

सुरेल भजनांची साथ

शोभायात्रेच्या मार्गावर गुरुदेव भजन मंडळाने सादर केलेल्या सुरेल भजनांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. भक्तांच्या पावलांना भजनांच्या तालावर ठेका धरण्यावाचून राहवले नाही.

नियोजन आणि यशस्वीता श्रीराम जन्मोत्सव उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवापासूनच या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. शोभायात्रा शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून हे आयोजन यशस्वी केले.

जाणी वार्ड येथील श्रीराम मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यंदाच्या या सोहळ्याने ब्रह्मपुरी शहरात भक्तीचा नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये