ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजेंद्र परतेकी यांना आयडॉल टीचर पुरस्कार

ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

 जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नाविन्यपूर्ण ३६५ दिवस शाळा चालवणारे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह शाळेचे विषय शिक्षक (मुख्याध्यापक) यांना ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र यांचा २०२५ – २६ चा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सन २०२१-२२ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.जिवती सारख्या अतिदुर्गम बहुल आदिवासी नक्षल भागात काम करत त्यांनी नाविन्यपूर्ण ३६५ दिवस शाळा चालवत इयत्ता पहिली ते चौथी ची शाळा इयत्ता दहावी पर्यंत नेली. ज्या गावात जाण्या – येण्यासाठी कुठलाही रस्ता नसताना सातत्यपूर्ण काम करत या वर्षी त्यांच्या शाळेतील मुलानी दहावीची परीक्षा दिली. सोबतच महाराष्ट्रातील ७५ लाख शिक्षकांमधून त्यांची आयडॉल टीचर म्हणून निवड झाली आहे. युट्यूब च्या माध्यमातून राजेंद्र परतेकी यांनी महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांना संभाजी नगर येथून लाईव्ह मार्गदर्शन केले आहे. सोबतच त्यांच्या कार्यशाळा व परिसंवाद इतर जिल्ह्यातील शिक्षक,पालक यांना मार्गदर्शन म्हणून चालू असतात. त्यांनी विविध उपक्रम राबवून देशात या शाळेचे नावलौकिक केले आहे.

या शाळेला भेटी देण्यासाठी दरवर्षी शेकडो शिक्षक,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,अधिकारी,तथा संस्था ह्या भेटी देत असतात. २९ मार्च २०२६ ला ग.दी.माडगूळकर नाट्यगृह,निगडी पुणे येथे त्यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. हा पुरस्कार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये