स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फ पोलीस स्टेशन पुलगांव येथील खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा उघड
अज्ञात आरोपीतांना ठोकल्या बेड्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २२/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे अनिलकुमार राजेंद्रप्रसाद कुरमवंशी, रा. मुंदडा कॉलणी, पुलगांव यांनी पोलीस स्टेशन पुलगांव येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, त्यांचे वडील नामे राजेंद्रप्रसाद बुध्दीप्रसाद कुरमवंशी, वय ७१ वर्ष, रा. रा. मुंदडा कॉलणी, पुलगांव हे दिनांक २१.०३.२०२६ रोजी सायंकाळी ०७. ३० वा. सुमारास त्यांचे मोटार सायकलने आपटी शेत शिवारातील शेतातुन घरी जात असता आपटी रोड वर एका मोटार सायकलवर तोंडाला डुपट्टा बांधुन असलेले दोन अज्ञात इसम पाठी मागुन आले व फिर्यादीचे वडीलास जिवाने मारण्याचे उद्देशाने उजवे बाजुच्या कुशीवर चाकुने मारुन गंभीर जखमी केले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व मेडीकल सर्टीफिकेट वरुन पोलीस स्टेशन पुलगांव अप. क्रमांक १७१/२०२६ कलम १०९, ३(५) भारतीय न्याय संहिता चा गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीता असतांना पुलगांव परिसरात अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असता घटनास्ळाचे आजु बाजुला लागलेले सि.सि.टी.व्ही फुटेज चेक केले असता एका मोटार सायकलवर दोन इसम तोंडाला दुपट्टे बांधुन जात असतांना अस्पष्ट दिसत असल्याने घटनास्थळाचा डम घेण्यात आला असुन डम मधील संशईत इसमांचे सी.डी.आर. घेण्यात आले.
आरोपीतांची ओळख पटविण्याकरीता मुखबिर नेमण्यात आले असता मुखबिर कडुन गोपनीय माहिती प्राप्त झाली की, आरोपी नामे मयुर दिनेश चंडाले, रा. पुलगाव याने त्याचे साथीदारासह वर नमुद गुन्हा केला असुन गुन्हा करतेवळी वापरलेल्या मोटार सायकलची ओळख लपविण्याकरीता काही स्पेअर पार्ट काढुन काही पार्टची तोडफोड केली आहे व ते दोन्ही आरोपी तारफैल, पुलगांव परिसरातील रेल्वे पटरीचे बाजुला खाली जागेत बसुन आहे. अशा मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक तारफैल, पुलगांव येथील रेल्वे पटरीकडील खाली जागेकडे जात असता पटरीचे बाजुला खाली जागेत दोन इसम बसुन दिसले. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथकाने सापळा रचुन घेराव टाकुन मोठ्या शिताफितीने ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव, गांव विचारले असतांना त्यांनी त्यांचे नाव १) मयुर दिनेश चंडाले, वय १८ वर्ष, रा. सुदर्शन नगर, पुलगांव, ता. देवळी, जिल्हा वर्धा, २) सुजल अमर सारसर, वय १९ वर्ष, रा. तारफैल, पुलगांव, ता. देवळी, जिल्हा वर्षा असे सांगीतले. सदर आरोपीतांना गुन्हयाबाबत विचारपूस केली असता आरोपी क्रमांक ०१ मयुर दिनेश चंडाले याने सांगीतले की, घटनेच्या काही दिवसा आगोदर नाचणगांव चौक येथे माझे मोटार सायकलचा जखमी नामे राजेंद्रप्रसाद बुध्दीप्रसाद कुरमवंशी, वय ७१ वर्ष, रा. रा. मुंदडा कॉलणी, पुलगांव यांचे मोटार सायकल सोबत अपघात झाला होता. त्यावेळी जखमी राजेंद्रप्रसाद बुध्दीप्रसाद कुरमवंशी यांनी मला शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरुन माझा मित्र सुजल अमर सारसर याचे मदतीने दिनांक २१.०३.२०२६ रोजी सायंकाळी ०७.३० वा. चे सुमारास जखमी हे त्यांचे मोटार सायकलने शेतातुन घरी जात असतांना आम्ही मोटार सायकलने मागुन येवुन उजवे बाजुच्या कुशीवर चाकुने वार करुन जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला व आमचे जवळ असलेल्या मोटार सायकने तेथुन पळुन गेलो असे सांगीतले. सदर आरोपीतांना पोलीस स्टेशन पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पुलगांव करीत आहे.
सदरची महत्वपुर्ण कारवाई मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शन व निर्देशाप्रमाणे श्री. विनोद चौधरी, पोलिस निरीक्षक, स.पो.नि. अशिषसिंह ठाकुर, पो.उपनि. विजयसिंग गोमलाडु, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. हमीद शेख, महादेव सानप, दिनेश बोथकर, पवन पन्नासे, गोविंद मुंडे, अखिल इंगळे, पो.कॉ. विनोद कापसे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



