ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर विकास महा अभियानास प्रारंभ
विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषद भद्रावती तर्फे महाराष्ट्र सुवर्ण नगर विकास योजना २०२५-२०२६ अंतर्गत विविध विकास कामे सुरू करण्यात आली असून त्याअनुषंगाने आज दिनांक २२ रोजी प्रभाग क्रमांक ८ किल्ला वॉर्ड येथे रस्ते डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
सदर भूमिपूजन प्रसंगी लोकसभा संघटक शिवसेना शिंदे गट मुकेश जिवतोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नगर विकासाला प्राधान्य देत नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी विकास कामांचा झंझावात सुरू केला असून सदर भूमिपूजन सोहळा प्रसंगी उपाध्यक्ष सुधीर सातपुते, नगर सेवक योगेश गाडगे, बांधकाम सभापती मंगेश सोनुलकर, महिला व बालकल्याण सभापती शोभा पारखी, नगरसेवक गिरिजा बेहरे, संतोष कुरेकर आदी सह वॉर्ड वासी उपस्थित होते.



