ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाप्पाच्या आठवणी व छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ उपक्रम

नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव हा सण आनंदाने साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी आणि या उत्सवाशी संबंधित कौटुंबिक कथा, बाप्पाचे फोटो, व्हिडीओ आदी बाबी डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ऑर्ग’(www.bappa.org) हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा, माहिती व छायाचित्रांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*नोंदणी करणाऱ्या कुटुंबाला प्रमाणपत्र :* 

आपल्या गणेशोत्सवाची माहिती यशस्वीरीत्या सादर करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या नावाने अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर #घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*सहभाग व नोंदणी पूर्णत मोफत*

नागरिकांना, ९१३६१७२६८१ या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून किंवा Bappa.org या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल. तसेच सोशल मिडीया फेसबुक, इंन्स्टाग्राम, युट्यूब, वरील @BappaOrg या सोशल मीडिया हँडलवरही उपक्रमाची माहिती उपलब्ध आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये