ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या दालनात निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत बैठक

लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांचा पाठपुरावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती :_ तालुक्यात एमआयडीसी च्या जागेवर न्यू. ग्रेटा एनर्जी व न्यू. एरा क्लिंनटेक कंपनीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल उपस्थिती होते.

निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागण्यांना टाळत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चकार शब्दही बोलल्या गेले नाहीत. हि बाब शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी पत्रव्यवहार करून राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या लक्षात आणून दिली. याची तात्काळ दखल घेत त्यांचे कार्यालयातून आज दिनांक १८ रोजी आदेशित पत्र काढून दिनांक २३ मार्च रोज सोमवार ला दुपारी २.३० वाजता निप्पॉन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्यमंत्री यांचे समिती कक्ष ३१९ विस्तार, मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येत आहे.

सदर बैठकीकरिता अपर मुख्य सचिव उद्योग मंत्रालय मुंबई, प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुकेश जिवतोडे व शेतकरी प्रतिनिधी व सर्व सबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आदेशित पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास आपली भूमिका मांडण्यास पाचारण करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांत संमिश्र भावना उमटली आहे.

लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या प्रयत्नामुळे निराश झालेल्या निप्पॉन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यात पुन्हा एकदा आशावाद निर्माण झाला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये