ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे विज्ञान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बबन भोयर होते. कार्यक्रमाची सुरुवात नोबेल विजेते सी. वी. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्याने शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये भाषण, रांगोळी आणि मॉडेल बनवणे या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये स्पर्धकांना त्यांच्या योग्यतेनुसार परीक्षकांनी प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक दिला व शेवटी त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक बबन भोयर,विश्वनाथ धोटे, अनिल मडावी व सलमा कुरेशी मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



