ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, जेष्ठ नागरिक संघटना चे कार्याध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी,पंडितराव पाथरकर, कवी रमेश नरोडे, उपस्थित होते सर्वप्रथम श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींचे पुजन करण्यात आले त्यावेळी, शांतीलाल निरफळे प्रा.अशोक डोईफोडे, प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, मराठी भाषेचे महत्त्व प्राचीन काळापासून संतांनी सांगितले, मराठी ही केवळ भाषा नसून संस्कृती असल्याचे सांगून तिचे जतन करणे गरजेचे आहे असे मान्यवरांनी सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार सचिव गोविंदराव बोरकर यांनी मानले शेवटी पसायदान व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये