ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीसांनी चोरीचे गुन्हे केले उघड

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्हे प्रकटीकरण पथक वर्धा शहर यांनी उघड केले दोन घरफोडी व एक सेवाग्राम पोलीस स्टेशन चा बॅटरी चोरीचा गुन्हा उघड पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे फिर्यादी सोहेल तुरक रा गांधीनगर वर्धा यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की ते त्यांच्या मामेभावाच्या साक्षगंधा कार्यक्रमाला दिनांक 20/ 4 /2024 रोजी कुटुंबासह गेले व परत ते दिनांक 23/04/2024 रोजी परत आले असता त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे समजले त्यांच्या घरून सोन्याचे दागिने व नगदी असा जन्मला किंमत 1,73,000 चा माल चोरी गेल्याचे समजले, पोलीस तपास करीत असताना फिर्यादी यांनी सदरची चोरी ही त्यांचा मावस भाऊ शेख इमरान शेख गफ्फार राहणार पुलगाव हल्ली मुक्काम गोंड प्लॉट वर्धा यांनी केल्याचे संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याचा कसून शोधली तो मिळून आला असता त्याच्यापासून गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने किंमत 25,000 रुपये एक मोपेड एक्टिवा गाडी 70,000 रुपये, एक मोबाईल किंमत 7000 रुपये, असा कि 1,02000 रुपये असा माल जप्त केला.

सदर आरोपी पोलीस तपासत असताना विचारणा केली असता त्याने पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील सक्षम स्कूल समोरील शेत शिवारातून एका कार आणि ट्रॅक्टरची बॅटरी चोरली त्याच्यापासून दोन बॅटरी किंमत 7,000 रुपये चा माल जप्त केला.

पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दी तिवारी लेआउट मालवाडी येथे सुद्धा घरकुडी केल्याचे सांगितले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा श्री नुरुल हसन सर, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर सर, ठाणेदार श्री पराग पोटे, यांचे मार्गदर्शनात PSI उमेश उगले, पोलीस हवालदार पंकज भरणे, प्रशांत वंजारी, पोलीस शिपाई श्रावण पवार, वैभव जाधव, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर तसेच सायबर पोलीस स्टेशन वर्धा पोलीस हवालदार कुलदीप टाकसाळे, अक्षय राऊत यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये