ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवी किशोर कवठे यांच्या ‘अरण्यदीक्षा’ काव्यसंग्रहाचे लोकार्पण 

चांदा ब्लास्ट

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित राजूरा येथील सुप्रसिद्ध कवी किशोर कवठे यांच्या ‘अरण्यदीक्षा’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील विख्यात कवी, अनुवादक व विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार राहणार आहे. सुनील नामदेव कवठे यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे लोकार्पण होईल. कवितासंग्रहावर भाष्य नांदेड येथील प्रसिद्ध लेखिका व समीक्षक सुचिता खल्लाळ करणार आहे. विशेष अतिथी म्हणून भंडारा येथील प्रसिद्ध कवी व चित्रकार प्रमोदकुमार अणेराव व चंद्रपूरचे कवी किशोर मुगल उपस्थित राहतील. कवी किशोर कवठे यांच्या कवितांचे अभिवाचन प्रवीण तुरानकर, अर्चना जुनघरे, गीता रायपूरे, राजेश देवाळकर करणार आहे. मराठी साहित्य विश्वात कवी किशोर कवठे यांची कविता दखलपात्र ठरली आहे. दगान या त्यांच्या प्रसिद्ध कवितासंग्रहानंतर ‘अरण्यदीक्षा’ हा त्यांचा बहुचर्चित कवितासंग्रह आहे. या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक अविनाश पोईनकर, सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर तर आभार प्रदर्शन सुरज दहागावकर करतील. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व स्तंभ पब्लिशिंग हाऊसने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये