कमल स्पोर्टींग क्लब व व्हॉइस ऑफ श्री छत्रपती टायगर बहुउद्देषिय संस्थाद्वारा शिवजयंती महोत्सव हर्षोल्लासात साजरा
शिवजयंती उत्सव सार्वजनिक स्तरावर सर्वत्र होण्याची गरज - हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीप्रित्यर्थ दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी ‘शिवजयंती महोत्सव-2026’ चे भव्य आयोजन करण्यात आले. महानगरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चैक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूर व व्हॉइस ऑफ श्री छत्रपती टायगर बहुउद्देषिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, मा. आमदार किशोर जोरगेवार, भाजप पदाधिकारी, नगरसेवक व शेकडो शिवभक्तांनी सकाळी 09.00 वाजता शिवछत्रपतींच्या स्मारकस्थळी शिवरायांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर भगवा ध्वजारोहण व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण करून शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली.
सकाळी 9.30 वाजता कमल स्पोर्टींग क्लब व व्हॉइस ऑफ श्री छत्रपती टायगर बहुउद्देषिय संस्थेच्या मार्गदर्शनात आयोजित भव्य रक्तदान शिबिरास भेट देऊन उभय नेत्यांनी राष्ट्रीय कार्यात योगदान दिल्याबद्दल रक्तदात्यांचे आभार मानले.
सायं. ६ वाजता शिवमहोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत पार पडले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, तर उदघाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे होते. महापौर सौ. संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष राजू घरोटे, राजेंद्र खांडेकर, श्यामल अहिर, कमल कजलीवाले, नगरसेवक नितेश गवळी, निलेश बेलखेडे, व्हॉइस ऑफ श्री. छत्रपती टायगर बहू. संस्थेचे पिंटू धीरडे, हर्षल कानमपल्लीवार, राम जंगम यांची मंचावर उपस्थित होते.
गणेशवंदना नृत्य अविष्कारानंतर शिवमहोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहभागी विविध चमूद्वारे सुरेख नृत्याविष्काराचे प्रदर्शन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी अफजलखान वधाचे दृश्य सुद्धा प्रदर्शित करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात हंसराज अहिर यांनी शिवजयंती उत्सव महासोहळ्याच्या आयोजनाची प्रशंसा करून अशा प्रकारचे आयोजन सार्वजनिक स्तरावर होणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे दैवत आहेत, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच राज्य व केंद्र शासन देशाला सर्वच क्षेत्रात यशोशिखराकडे नेण्याचा प्रयत्न करीत असून राष्ट्रसुरक्षा, विदेशनीती व राष्ट्र तथा सामाजिक उन्नतीचे धोरणे ही शिवरायांच्या नितीमूल्यांचीच देणगी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रवींद्र शिंदे म्हणाले की छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेणार्या या उपक्रमात उपस्थित राहता आले हे अहोभाग्यच आहे, या अनुषंगाने एका ऐतिहासिक आठवणीचा उल्लेख करण्याशिवाय राहवत नाही ज्यावेळी शिवराय माता महाकालीच्या दर्शनाकरिता आले होते त्यावेळी आमचे शिंदे कुटुंबीय घोडपेठला स्थायिक झाले आणि तेव्हापासून निष्ठावान मावळे म्हणून त्यांच्याच विचारावर आम्ही आजही वाटचाल करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरणे आत्मसात केल्याशिवाय राष्ट्राची प्रगती शक्य नसल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव यांनी सुद्धा समयोचित विचार व्यक्त केले.
रघुवीर अहीर यांनी आपल्या प्रस्थाविक भाषणात छत्रपती राजे शिवरायांच्या असामान्य नेतृत्व व महान कर्तृत्वातून बोध घेत युवकांनी त्यांच्यातील राष्ट्राभिमान आपल्या अंगीकारत राष्ट्रसेवेत योगदान देण्यास समर्थ व्हावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपुज्य गोळवलकर गुरुजी यांचीही आज जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन. गुरुजींनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत हिंदूंत्व संघटन उभे केले त्यामागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपतींचा आदर्श घेऊनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारत असल्याचे सांगत वर्तमान पिढीने महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाचे मनन व चिंतन केले पाहिजे महाराजांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयुर भोकरे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येत शिवभक्त नागरिक महिला, युवक, युवती व आबाल वृध्दे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राहुल गायकवाड, सुदामा यादव, प्रतीक शिवणकर, शैलेश दिंडेवार, राहुल सूर्यवंशी, आशय चंदनखेडे, सलीम मामू शेख, ऋतुजा धानोरकर यांचेसह संस्थेच्या पदाधिकारी व अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचीअखेर महाप्रसादानी करण्यात आली



