अट्टल इराणी गुन्हेगार ताब्यात
बॅंकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणुक ; गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सदर गुन्ह्यातील फिर्यादी विठ्ठल कवडू कुबडे वय 67 वर्ष, रा. वडनेर हे दि. 13/05/2025 रोजी दुपारी वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते पैसे मोजत असताना एक अनोळखी ईसम त्यांचेजवळ आला व त्यांचे पैसे मोजण्यास हाती घेऊन हातचलाखी करून फिर्यादीची फसवणुक केली. फिर्यादीच्या ही बाब लक्षात येताच दि. 14/05/2025 रोजी पो. स्टे. वडनेर येथे त्यांनी तक्रार दिल्याने अप क्र. 183/2025 कलम 318 (4) BMS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक करीत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा कामठी येथे राहणाऱ्या इराणी वस्तीतील आरोपीने केला असल्याचे मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे दि.15/5/25 रोजी इराणी आरोपी नामे नासिर अली आमीर अली, वय 45 वर्ष, रा. बाबा दिवानी मज्जित जवळ माडा चौक आजरी माजरी यशोधरा, जि. नागपुर यास त्याचे राहते घरून ताब्यात घेवुन, त्यास कसून विचारपुस केली असता, आरोपीने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे शेख रफिक शेख युसुफ रा. नवाबपुरा लकडापुरा नागपूर याचे सह केल्याची कबुल दिली. आरोपी नासिर अली आमीर अली यास पुढील कारवाई करिता पो. स्टेे. वडनेर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पो.नि. विनोद चौधरी, पोउपनि सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, यांनी केली आहे