ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरी नगरपरिषद नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.

चांदा ब्लास्ट : ब्रम्हपुरी :-

ब्रम्हपुरीच्या विकासामध्ये मानाचा तुरा म्हणुन ही नवीन इमारत शहरातील जनतेसाठी खुली करत या इमारतीचे लोकार्पण करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. मंदिराचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे, तेवढेच या कार्यालयांचे पावित्र ठेवणे जनतेसह लोकप्रतिनिधींचे सुद्धा कर्तव्य आहे असे मौलिक विचार आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. तसेच ब्रह्मपुरी करांचा आस्थेचा विषय ब्रह्मपुरी जिल्हा माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही व मी ब्रह्मपुरी जिल्हा करणारच असे यावेळी उपस्थिताना आ. विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले. आश्वासन देताच उपस्थितांनी टाळ्यांचा गळगळाट केला. ते ५ जुलै रोजी आयोजित नगर परिषद ब्रम्हपुरीच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारत आणि राजीव गांधी सभागृहाचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उषा चौधरी तहसिलदार ब्रम्हपुरी या होत्या. स्वागताध्यक्ष म्हणून रिता उराडे नगराध्यक्ष न. प. ब्रम्हपुरी, अशोक रामटेके उपाध्यक्ष न.प. ब्रम्हपुरी, मोहम्मद आर्शिया जुही मुख्याधिकारी न.प. ब्रम्हपुरी, बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार, सभापती, अँड. दिपक शुक्ला, सभापती महेश भर्रे, सभापती सुनीता तिडके, सभापती निलिमा सावरकर, माजी नगराध्यक्ष पवन मगरे, माजी नगराध्यक्षा योगिता बनपुरकर, नगरसेविका सरिता पारधी, नगरसेवक नितीन उराडे, प्रीतेश बुरले, लता ठाकूर, वनिता अलगदेवें, मनोज वटे, सतिश हुमने, गौरव भैया, अर्चना खंडाते, अंजली उरकुडे, पुष्पा गराडे, सागर आमले, रुपाली रावेकर, सपना खेत्रे, हितेंद्र राऊत, राकेश कऱ्हाडे हे होते. या कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी आरोग्य विभागाचे सभापती ॲड. दीपक शुक्ला यांनी आ. विजय वडेट्टीवार यांनी नगर परिषदेला किती निधी मिळवून दिली, त्यांनी केलेल्या सहकार्याची, त्यांच्या कार्यकाळात किती विकास कामे करण्यात आली व त्यासाठी केलेले प्रयत्नांची माहिती देत नवीन प्रशासकीय इमारत ब्रम्हपुरीच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. याठिकाणी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामं व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराच्या विकासाला चालना देणारा असेल असे शास्वत करत ज्यांनी ज्यांनी घरकुल अंतर्गत घर बांधले त्यापैकी ज्यांची रक्कम शिल्लक आहे अश्या नागरीकांना लवकरच शासनाकडून ३.६० कोटी रक्कमेचा हप्ता येणार असल्याची अत्यंत हत्वाची माहिती दिली.

तर नगराध्यक्षा रिता उराडे यांनी या नवीन इमारतीची निर्मिती कश्या पद्धतीने केली याचा घटनाक्रम सांगितला व त्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

नगर परिषदेच्या समस्त अधिकारी व कर्मचारीवृंदा सह कंत्राट कामगारांनी नवीन प्रशासकीय इमारतीच्या व राजीव गांधी सभागृहाचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास अत्यंत उल्लेखनीय कामगिरी पार पाडत कार्यक्रम यशस्वी केले.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये