महाराष्ट्र

तहसील कार्यालयात अभ्यंगतास बसायच्या खुर्च्या तुटलेल्या

आवारात केर कचऱ्याचा भंडार

चांदा ब्लास्ट : ब्रम्हपुरी :-

तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक कामासंबंधाने तहसील कार्यालयात येत असतात.

सरकारी काम व बारा महिने थांब या उक्तीला अभिप्रेत लोकसेवकांची काम करण्याची पद्धत असल्याने कार्यालयात आलेल्या नागरिकांचा आल्या आल्या काम होणार नाही हे तेवढेच खरे!

कामाकरिता आलेल्या नागरिकांना वेळ लागत असल्याने बसण्यास खुर्चीची व्यवस्था तहसील कार्यालयात करण्यात आली होती. मात्र ह्या खुर्चीची अवस्था बेकार झालेली असून अभ्यंगतांना उभेच राहावे लागते. याचा प्रत्यक्ष अनुभव तहसील कार्यालयात आल्यास अनुभवास नक्कीच मिळतो.

दुसरीकडे शासन संपूर्ण देशभरात स्वच्छता उपक्रम राबवत आहे व स्वच्छते करिता करोडो रुपये खर्च होत आहेत. शासकीय कार्यालयात स्वच्छता असणे आवश्यक असून तसा संदेश जनमानसात जातो. मात्र तहसील कार्यालयाच्या आत मधील आवारात ठीक ठिकाणी कागदांचा कचरा  भंडार पडलेला दिसतो तर कुठे यापूर्वीचा कचरा जाळला असल्याचे दिसून येतो. त्यामुळे या विभागातील अधिकारी कर्मचारी शासनाच्या उपक्रमाची दखल घेत नसतील तर सामांन्यांची काय केवा करण्यात येईल.

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये