ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारुबंदी कायद्याअन्वये सेलू पोलीसांची कारवाई

एकूण 2 लाख 51 हजारावर माल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 02/01/2024 रोजी सायंकाळी 16.25 वा. दरम्यान मौजा महाबळा(गांगापुर) शेत शिवारातील नाल्याचे काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी नामे विष्णू रामभााऊ वाटेकर, वय-30 वर्ष, रा. कोथीवाडा, सेलू. हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने सदर आरोपीचे ताब्यातून मौक्यावर 3 लोखंडी ड्रम मध्ये उकळता मोहा रसायन सडवा 300 लीटर, 07 लोखंडी ड्रम मध्ये 1400 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा, 4 प्लास्टिक डबकीत 81 लीटर गावठी मोहा दारु व हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य तसेच एक हिरो होंडा कंपनीची मो.सा. क्र. MH31CC1028 असा एकूण जु.कि. 2,51,500/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी नामे विष्णू रामभाऊ वाटेकर, रा. कोथीवाडा याने कोथीवाडा येथे राहणारा चेतन गोंडाणे याचे संगनमताने हातभट्टी लाऊन गावठी मोहा दारू गळीत असल्याचे सांगितल्याने क्र.1) विष्णू रामभाऊ वाटेकर, वय 30 वर्ष, क्र. 2 चेतन गोंडाणे दोन्ही रा. कोथीवाडा. ता. सेलू जि. वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ., 83 मदाका सहकलम 3(1),181,177,130 मोवाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, विक्रम काळमेघ यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये