ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर तर्फे ग्राहक दिन साजरा

चांदा ब्लास्ट

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर तर्फे दिनांक १७ रविवारी गजानन महाराज मंदिर सरकार नगर येथे साजरा करण्यात आला.

ग्राहक दिनाला अध्यक्ष म्हणून नंदिनी प्रकाश चूनारकर ,प्रमुख अतिथी ऍड.कल्पना जांगडे कुटे माजी सदस्य ग्राहक तक्रार निवारण आयोग चंद्रपूर तर सत्कार मूर्ती संगीता लोखंडे आणि जिल्हा संघटन मंत्री वसंत वरहाटे उपस्थित होते.

सर्वप्रथम स्वामी विवेकानंद ह्यांच्या प्रतिमेला वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश तुम्मे ह्यांनी केले.

सुरुवातीला संगीता लोखंडे ह्यांना ग्राहक पंचायत च्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून गौरवण्यात आले .त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य त्यांना आलेल्या अडचणी याविषयी आपले मनोगत मांडले.

मान्यवरांकडून ग्राहकांना येणाऱ्या समस्या , ई कॉमर्स बद्दल येणाऱ्या अडचणी,त्यांचे निवारण .जागरूकता सजगता किती महत्वाची आहे.तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत अ. भा. ग्राहक पंचायत च्या अशासकीय सदस्य कडून घेतले गेलेले विषय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेली कारवाही विशद करण्यात आली कार्यकर्त्यां चे मनोगत झाले.आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री हेमराज नंदेश्वर ह्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रामुख्याने जिल्हा सचिव प्रभात कुमार तन्नीरवार आणि महेश कांनपिल्लेवार ह्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपरे सर,सुरेश तूम्मे, वाघमारे, गरगेल वार,हेमराज नंदेश्वर,अशोक मुडेवार,सुरेश नन्नावरे,विजय लोखंडे वनकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये