Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एका रात्रीमध्ये तिन घरफोडी करणारा आरोपी ताब्यात

एकूण 38 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 07/11/2024 रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला कि, दिनांक 05/11/2024 ते 06/11/2024 रोजी रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने हिंगणघाट परिसरात वेगवेगळ्या तीन घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून तीन घरफोड्यातुन एक रेडमी कंपनीचा मोबाईल व सोन्या- चांदीचे दागीने असा मुद्देमाल चोरुन घेऊन गेल्याबाबत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

       सदर तिन्ही घरफोड्यांचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून समांतर तपास करीत असताना दिनांक 02/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या व तांत्रिकदृष्ट्या तपास करून दोन विधी संघर्षित बालक यांना त्यांच्या नातेवाईकाच्या समक्ष ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की दिनांक 05/11/2024 व 06/11/2024 चे रात्र दरम्यान नागपूर येथील अट्टल गुन्हेगार नामे छोटू डेहारीया रा. शांती नगर नागपूर यांच्यासोबत हिंगणघाट येथे मोटार सायकलने तिन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्या असुन सोने चांदीचे दागिने नागपूर येथे राहणारा नामे पंकज बंडोजी सत्रमवार या विकल्याचे सांगितले त्यास औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथून ताब्यातून सोन्याचे मणी व नाकातील नथ अंदाजे किंमत 27,000/- रुपये चा मुद्द्यामाल व विधी संघर्षित बालकांच्य ताब्यातून रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत 11,300/- रुपये असा एकूण 38,300/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर तिन्ही घरफोडीतील उर्वरित मुद्देमाल हा फरार आरोपी नामे छोटू डेहारीया नागपूर यांच्याकडे असल्याने स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाद्वारे शोध घेणे सुरू आहे. दोन्ही विधी संघर्षित बालक व मुद्देमाल विकून देणारा आरोपीस पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या ताब्यात देण्यात आले.पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

          सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, पोउनि सलाम कुरेशी पोलीस आमंलदार हमीद शेख, शेखर डोंगरे,सचिन इंगोले, प्रमोद पिसे, राजेश तिवसकर, आशिष महेशगौरी, रामकिसन इप्पर, विकास मुंडे,अरविंद इंगोले, शुभम राऊत, सुगम चौधरी, मुकेश ढोके रितेश गेटमे, दिनेश बोथकर, अंकित जिभे, सायबर सेल वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये