देऊळगाव राजा येथे विद्दुत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळावाचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी उपविभाग देऊळगाव राजा च्या वतीने उपविभागीय कार्यालय, देऊळगाव राजा येथे 18 ऑगस्ट ला सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.
तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक वित्त व लेखा विकास बांबल,उपकार्यकारी अभियंता संदीप शेटे,निलेश लंके व इतरांनी केले.
या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या, व बऱ्याच समस्या दूर केल्या,व काही समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी महावितरणच्या मोबाईल ऍप बाबतीत माहिती दिली, ऑनलाइन बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भरत गुप्ता, गजानन पुजारी,प्रशांत देशमुख, किरण एंडोले, प्रफुल्ल सारडा प्रामुख्याने उपस्थित होते.