सततच्या पावसाने ग्रामीण रसत्याची लागली वाट
सिंदोळा - कडोली डोनाळा - ऊपरी रस्त्यावर जीवघेणे खड्डे ; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
जिल्ह्यासह तालुक्यात पावसाने कहर केल्याने ग्रामीण रसत्याची वाट लागली असून रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड़े निर्माण झाले असल्याने सदर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत सततधार पावसाने गेली चार दिवस कहर केल्याने जनजीवन प्रभावित झाले परिणामी ग्रामीण भागातील नाले फुगले वाहतूक खोळबली नाल्यासह रस्त्यावर पानी जमा झाल्याने पावसामुळे सबंध रसत्यावर खड्याची निर्मिति झाली सोबतच सदर भागालगत वैनगंगा नदी वाहत असल्याने याच भागातुन मोठ्या प्रमाणात गौनखनिज साहित्य रेती आणि बदरी मुरुम मातीची मोठी चोरटी वाहतूक केलि जात असल्याने सततच्या वाहतुकीमुळे सबंध रसत्याचि वाट लागली त्यातच पावसाचि भर पडून पावसाने झोङपूण टाकल्याने अवैद्य चोरटी वाहतूक आणि पावसाच्या तडाक्याने रस्त्यावर जीवघेणे खड़े निर्माण झाले असून वाहतुकीला मोठी अडचन निर्माण होत आहे दिवस पावसाचे असल्याने रसत्यावर पानी साचुन राहत असून खड्याचा अंदाज समजत नसल्याने सदर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे त्यामुले खड्यात रस्ता की रसत्यात खडा असी अवस्था निर्माण झाली असून वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे अवैद्य वाहतूक आणि सततच्या पावसामुळे तालुक्यातील सिंदोळा -कडोली-डोनाळा ते ऊपरी आदि मार्गावरिल सर्व रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून सदर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे आशा गंभीर बाबिकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते सदर रसत्याची डागडूगी करन्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
रस्त्याच्या कामाचे टेंडर होऊनही काम झाले नाही आणि जळ चोरटी वाहतूक आणि सततच्या पावसामुळे रसत्याची वाट लागली रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले त्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात आहे तेव्हा किमान कमीत कमी रसत्याची डागडुगी तरी करन्यात यावी.
किशोर कारड़े
सावली तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष तथा सरपंच ग्रा प कढोली.