ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयडीसी मध्ये उद्योग उभारणीकरिता येणाऱ्या विविध समस्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भेट

भारत राष्ट्र समितीचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

भारत राष्ट्र समिती तर्फे जिल्हा समन्वयक पवन तिजारे यांनी उद्योगमंत्री माननीय उदयजी सावंत यांची एमआयडीसी मध्ये उद्योग उभारणी करिता येणाऱ्या विविध समस्या बाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली.

वर्धा औद्योगिक क्षेत्रातील अनेक भूखंड हे अजूनही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. सर्वसुविधा उपलब्ध झाले नंतरच भूखंड विकास कालावधी ग्राह्य धरण्यात यावा. उद्योगांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हा ४०% बांधकामाची अट नव्याने टाकण्यात आलेली आहे, परंतु अनेक उद्योगांना मोकळ्या जागेची आवश्यकता जास्त असते तसेच त्यांचे मशिनरी सहित्य हे कमी जागेमध्ये सुद्धा कार्यान्वित होवू शकतात.

असे असतानाही उद्योजकाला, ४०% बांधकाम आवश्यकता नसतानाही करावे लागेल. तरीही ही अट पूर्ववत करण्यात यावी. जिल्ह्यातील म. औ. वि. म. मधील श्रेत्र व्यवस्थापक पद हे मंजूर असून हे कामकाज नागपूर येथून सुरू आहे करिता वर्धा येथे कायामस्वरुपी कार्यालय सुरू करण्यात यावे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती करिता 10% आरक्षित असलेले भूखंड अजूनही आवंटित करण्यात आलेले नाही. या बाबीकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर भूखंड वाटपाची प्रक्रिया करण्यात यावी. याबाबत निवेदन देण्यात आले.

सर्व मुद्यावर विस्तृत चर्चा करूण मा. उद्द्योगमंत्री यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व वरील सर्व समस्यांचे येत्या जानेवारी महिन्यापर्यंत निराकरण करण्याचे मौखिक आदेश दिले तसेच अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती करिता 10% आरक्षित असलेल्या भूखंड वाटपाची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात येईल असे सांगितले.

सदर निवेदन देताना भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक पवन तिजारे, दलीत इंडस्ट्रिअल चेंबर ऑफ कॉमर्स चे जिल्हाध्यक्ष अरविंद गोटेकर, रविंद्रजी कोटंबकर बी आर स पार्टी प्रवक्ता अजय घंगारे, अनिकेत शिंदे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये