ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

प्रथम शिक्षण परिषद केंद्र-पारडी पं. स. कोरपना पहिली शिक्षण परिषद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर

जील्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी येथे 2023-24 या सत्रातील पहिली शिक्षण परिषद संपन्न झाली.अध्यक्ष- श्री निलेश येरकाडे सरपंच ग्रा. पं. पारडी

*प्रमुख मार्गदर्शक*
१ *)श्री तलांडे सर * * केंद्रप्रमुख*
*केंद्र-पारडी **
२)*कु कुसराम मॅडम (brc korpana)
३)श्री टेकाम सर (brc korpana)
४)श्री कोरडे सर (brc korpana)
5) श्री झिले सर (brc korpana )

शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून परिषदेची सुरुवात करण्यात आली.पारडी केंद्रात नव्याने रूजू झालेल्या शिक्षकांचे केंद्रप्रमुख यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक श्री तलांडे सर केंद्रप्रमुख यांनी केले. प्रास्ताविकातून शि. परिषदेची रुपरेषा विशद केली. विद्याप्रवेश, सेतू अभ्यास, एकात्मिक पाठ्यपुस्तक, अध्ययन स्तर निश्चिती इ. बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले. श्री मरापे सर मुख्याध्यापक शाळा पारडी यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री कोरडे सर वि. सा. व्यक्ती यांनी एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा परीचय करून दिला. तसेच पाठ्यपुस्तकातील पानात कोणत्या नोंदी घ्यायच्या याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री टेकाम सर यांनी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत मार्गदर्शन केले.कु कुसराम मॅडम यांनी पण तासिका घेतली त्यात त्यांनी शालाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण याबद्दल सखोल अशी माहिती दिली.श्री झिले सर यांनी दिव्यांग विद्यार्थी प्रकार तथा प्रशास्थ ऍप विषयी माहिती दिली.

पुन्हा मा. केंद्रप्रमुख तलांडे सर यांनी 2022-23या सत्रातील अध्ययन स्तर शाळा निहाय तथा इयत्ता निहाय आणि या सत्रातील अध्ययन स्तर शाळांनीहाय तथा इयत्ता निहाय याचे विश्लेषण करून माहिती घेतली आणि अगदी सखोल असे विवेचन केले. स्तराचे गट तयार करून नियोजन करून दिले.

शिक्षण परिषदेला गटशिक्षणाधिकारी यांची भेट

प्रशिक्षण चालू असताना पंचायत समिती कोरपणाचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी साहेब यांनी आकस्मिक शिक्षण परिषदेला भेट दिली आणि शिक्षकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

सुरुची भोजन

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी यांच्याकडून सुरूची भोजन देण्यात आले.

दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा
एकदा सत्राची सुरुवात…

नंतर श्री तलांडे सर केंद्र प्रमुख यांनी पुन्हा एकदा विद्या समीक्षा केंद्र या तासिकेला सुरुवात करून मार्गदर्शन केले त्यात विद्या समीक्षा केंद्र याविषयी सखोल माहिती दिली
यामध्ये एक पूर्व चाचणी घेण्यात आली Swift chat ही ॲप इंस्टॉल करून तिचा वापर कसा करायचा याविषयी प्रॅक्टिकल घेण्यात आले आणि डेटा अनालिसिस विषयी माहिती देण्यात आली.नंतर केंद्र प्रमुखांनी प्रशासकीय विषयांची माहिती दिली.
शेवटी वंदे मातरमने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.सूत्रसंचालन श्री जाधव सर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी

शब्दांकन -श्री निलेश भुडे वि. शि. जिल्हा परिषद उ.प्राथमिक शाळा कोठोडा (बू )केंद्र पारडी पं.स.कोरपना

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये