देवांग वस्त्रालयाने जोपासली सामाजिक बांधिलकी
आनंदी बोरव्हान सोहळा मध्ये चार हजार महिलांनी नोंदविला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरात 1986 मध्ये अगदी कमी जागेत प्रवीण रोडे या ध्येयवेड्या युवकाने देवांग वस्रालय नावाचे छोटेसे दालन शहरवासी साठी व पंचक्रोशितील जनतेसाठी सुरू केले त्यांनी संपूर्ण शहरासह पंचक्रोशीत आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला.
समाजात वावरताना आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेने त्यांनी *मकर संक्रांत सना निमित्ताने* आपल्या देवांग वस्रालयाच्या दालनात खास महिलांसाठी *आनंदी बोरव्हान हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन* केले होते दिनांक 25 जानेवारी 26 रोजी सकाळपासूनच या दालनात महिलांनी हळदीकुंकवासाठी येण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली देवांग वस्रालयाच्या प्रमुख उर्मिला गणेश रोडे ,भावना प्रवीण रोडे, रूपाली शशिकांत रोडे व रेणुका तेजस रोडे यांनी येणाऱ्या प्रत्येक महिलांचे स्वागत करून औक्षण केले जवळपास चार हजार महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी भगवंत आहे.
अशी भावना मनात ठेवल्यानेच आज देवांग वस्रालयाचे नाव कापड विक्रीच्या व्यवसायात अग्रगण्य असून या नावाला साजेशे असे काम मुख्य मालक प्रवीण रोडे व तेजस रोडे करताना दिसून येत आहे त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे शहरात व पंचक्रोशीत देवांग चे नाव ठीक ठिकाणी चर्चिल्या जात होते.



