ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालय, समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, समर्थ स्कूल ऑफ नर्सिंग, समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे, सहसचिव तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोज कायंदे, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे, प्राचार्य योगेश ताठे, प्राचार्य सचिन घुगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश डोईफोडे, प्रा. गबाजी कुटे, शेतीनिष्ठ शेतकरी संपतराव खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून स्वातंत्र्याला शिस्त, दिशा व मूल्यांची जोड दिली. आजचा विद्यार्थी हा केवळ शिक्षण घेणारा नसून तो उद्याचा जबाबदार नागरिक आहे. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भारत सक्षम करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वैज्ञानिक उपाय देणे आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच “जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या त्रिसूत्रीवर चालतच भारत महासत्ता बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे यांनी सांगितले की, भारत देश हा विविधतेत एकता जपणारा देश असून प्रजासत्ताक दिन हा एकता, सार्वभौमत्व आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. युवकांनी संविधानातील मूल्ये आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन सोळंकी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) स्वयंसेवक व रासेयो अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी केले. साधना आटोळे,

अंकीता गायकवाड,साक्षी तायडे या विद्यार्थिनींचे सजावटीसाठी सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नागरे, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. इंगळे, प्रा. धांडे, डॉ. उषा जायभाये, प्रा. जायभाये, प्रा. सानप, प्रा. शेळके, प्रा. सातपुते, प्रा. राजपूत, डॉ. पाटील, प्रा. कवर, प्रा.देशमुख आदी प्राध्यापक तसेच गजानन देवमाने, बद्रीनारायण काळे, उमाळे, शेख अरबाज, आंतरकर, सय्यद असीम, लाड, काळुसे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम शांततामय, शिस्तबद्ध व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये