ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी मार्गदर्शन कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्याल, राजुरा येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा प्रफुल्ल माहूरे (उपप्राचार्य, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. इर्शाद शेख यांनी रोपटे देऊन प्रफुल्ल माहूरे यांचे स्वागत केले तसेच त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. मंगेश कुळमेथे यांनी प्रा. विवेक पाल यांचे स्वागत करत कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ केला.

माहूरे सरांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याचे बारकावे, लेखन कौशल्य कसे विकसित करावे, अभ्यासाची परिणामकारक पद्धत, तसेच ऑनलाइन अभ्यास करताना घ्यायची विशेष काळजी याबाबत मार्गदर्शन केले. केवळ पास होण्यासाठी नव्हे तर उच्च गुण मिळविण्यासाठी आवश्यक टिप्सही त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव EnglishForMe.in या वेबसाइटचा शैक्षणिक उपयोग कसा करावा, Writing Skills, Prose–Poetry Notes, Test Series व सराव साहित्य कसे वापरावे यावरही विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेत कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये