ताज्या घडामोडी

संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन आराखड्यांना विद्यापीठाने मान्यता द्या – गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने विविध शाखेतील विषयाच्या संशोधन व मान्यता समितीच्या (R.R.C.) सभा दिनांक 07 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित केली असुन ह्याचे वेळापत्रक आणि पात्र संशोधन विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठने प्रसिद्ध केलेली आहे. अनेक नव संशोधन विद्यार्थ्यांनी विद्यापीठ नियमानुसार संशोधन केंद्रावर आपली नोंदणी करून R.A.C. च्या माध्यमातून संशोधन विषयाला व आराखड्याला मंजुरी प्राप्त करून घेतलेली आहे, विद्यार्थ्यांनी संबंधित संशोधन केंद्राला आणि विद्यापीठांमध्ये याबाबतचे नोंदणी शुल्क देखिल भरलेले आहे मात्र तरीही त्यांची नावे ह्या यादीत समाविष्ट करण्यात आली नसल्याने नव संशोधकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

परंतु अनेक नव संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन आराखडे व नावे विद्यापीठ संशोधन व मान्यता समितीच्या(R.R.C.) समोर सादरीकरण आणि मान्यतेकरिता समाविष्ट झालेली नसल्याचे आढळून आल्याने

या नव संशोधन विद्यार्थ्यांनी विद्यापीठ नियमानुसार संशोधन केंद्रावर आपली नोंदणी करून R.A.C. च्या माध्यमातून संशोधन विषयाला व आराखड्याला मंजुरी प्राप्त करून घेतलेली आहे, विद्यार्थ्यांनी संबंधित संशोधन केंद्राला आणि विद्यापीठांमध्ये याबाबतचे नोंदणी शुल्क देखिल भरलेले आहे. त्यासोबतच या नव संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन कार्याची दिशा देण्याच्या दृष्टीने संशोधन आराखडा तयार करताना विद्यापीठ मान्यता प्राप्त आचार्य पदवी मार्गदर्शकांनी मेहनत घेऊन त्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन आराखडे तयार करण्यास मार्गदर्शक केलेले आहे. संबंधित संशोधन विद्यार्थ्यानी संशोधन मान्यतेची संपुर्ण प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केलेली असल्याने त्यांचे विषय व संशोधन आराखडे संशोधन व मान्यता समितीच्या(R.R.C.) मान्यतेकरीता समाविष्ट न करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यांच्यात असंतोषाचे व भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

करिता विहित मुदतीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून विद्यापीठांमध्ये सादर झालेले संशोधक विद्यार्थ्यांचे विषय व संशोधन आराखडे (Synopsis) यांना संशोधन व मान्यता समितीच्या(R.R.C.) मान्यते करिता ठेवण्यात यावे व सादरिकरणाकरीता या सर्व विद्यार्थ्यांचे नावे यादीमध्ये समाविष्ट करून त्याबाबतची सुधारित परिपत्रक काढण्यात यावे. याबाबत चे निवेदन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने मा. कुलगुरू आणि मा. प्र-कुलगुरू यांना देण्यात आले. तत्पूर्वी संघटनेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ संजय गोरे यांनी विद्यापीठातील प्रमुख अधिकारी वर्गासोबत फोनद्वारे सविस्तर चर्चा केलेली होती.
मा. प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे सर यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून मा.प्र-कुलगुरू महोदयांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल याविषयी आस्वाशित केले आहे. चर्चेमध्ये संघटनेचे सचिव तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.विवेक गोर्लावार, उपाध्यक्ष तथा विद्यापरिषद सदस्य डॉ. विजय वाढई, डॉ. रामदास कामडी, प्राचार्य डॉ वरखड सर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये