ताज्या घडामोडी

घरकुलाच्या रक्कमेसाठी लाच मागणारा कंत्राटी अभियंता रंगेहाथ अडकला जाळ्यात – 5000 रुपयांची केली होती मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघणाऱ्या नरेंद्र मोदी ह्यांनी राबविलेल्या पंतप्रधान आवास योजनेतच भ्रष्टचार सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाला प्राप्त तक्रारीवरून उघडकीस आले असुन प्राप्त तक्रारीची शहानिशा करून विभागाने कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्याला रंगेहाथ अटक केल्याने खळबळ माजली आहे.

प्राप्त माहतीनुसार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना घरकुल दिल्या जाते. ह्या योजनेनुसार घरकुल धारकास बांधकामाचे विविध टप्पे पुर्ण झाल्यानंतर एकुण चार टप्प्यांत निधी हस्तांतरित केल्या जातो. ह्याच अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील निंबाळा येथील एका व्यक्तीला सन 2021-22 मधे घरकुल मंजूर झाले होते. नियमाप्रमाणे त्याने बांधकाम सुरू केले. त्याला ह्यापूर्वी बांधकामाच्या निधीचे दोन हप्ते देण्यात आले मात्र 45000/- रुपयांचा तिसरा हप्ता जमा करण्यापूर्वी चंद्रपूर पंचायत समिती मधे कार्यरत 33 वर्षीय कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता स्वप्नील बबन निमगडे ह्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदारास सदर अभियंत्याला लाच द्यावयाची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. लाप्रवीने दिनांक 21/07/2023 रोजी केलेल्या पळताळणी कार्यवाही मध्ये कंत्राटी अभियंता स्वप्नील बबन निमगडे यांनी तक्रारदारास 5000/- रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2000/- रू. स्विकारण्याचे मान्य केल्याचे दिसुन आल्याने सापळा रचून सदर अभियंत्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सदर यशस्वी कारवाई ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पोहवा अरूण हटवार, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, पो.अ. राकेश जांभुळकर, म.पो.अ. मेघा मोहुर्ले व ला.प्र.वी. चंद्रपुर चालक सतिश सिडाम यांनी पार पाडली.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/ कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

राहुल माकणीकर, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय नागपुर दुरध्वनी क्रमांक 0712-2561520 टोल फ्री क्रमांक 1064 अथवा www.acbmaharashtra.gov.in ह्या वेब साईट वर त्याचप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपुर फोन क्र. 07172-250251, मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपुर मो.न. 9322253372, जितेन्द्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपुर मो.न. 8888857184 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये