ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

०७साथीदारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस ठाणे वर्धा शहर येथे दिनांक २३/१२/२०२५ रोजी फिर्यादी हि कुटुंबासह आपले राहते घरी हजर असतांना गुन्हयातील आरोपी नामे १) आयुष वावरे, २) कोहीनुर उके, ३) आकाश पुसदेकर, ४) लाल्या यादव, ५) यश देवगडे, ६) दद्दु जवादे, ७) फरदीन शेख ८) मयुर इंगोले यांनी संगणमताने गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादीचे घराचे समोर येवुन दहशत निर्माण करून फिर्यादीचे पतीला तु बाहेर ये, तुला बघुन घेतो असे बोलुन शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. आरोपीतांनी फिर्यादीचे घरासमोरील चारचाकी कार चे समोरील मुख्य काचावर तसेच बाजुचे व मागचे डोअर ग्लासवर दगड व विटा मारून काचा फोडल्या व शिवीगाळ करून धमकावुन दहशतीचे वातावरण निर्माण केले. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून प्रथमदर्शी आरोपीतांविरूद्ध पोलीस ठाणे वर्धा शहर येथे अपराध क. १८६१/२०२५ कलम १८९,३२४(४), ३२४ (६),३५१(२), ३५२ भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हेगारांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता असे निदर्शनास आले आहे. कि, यातील आरोपी ०१) आयुष पुरूषोत्तम वावरे ०२) कोहीनुर संजय उके ०३) आकाश उर्फ डुडडु पुरूषोत्तम पुसदेकर ०४) सौरभ उर्फ लाल्या रोजश यादव ५) यश चंद्रशेखर देवगडे, ६) सुदर्शन उर्फ दट्टु सुनील जवादे, ७) सैय्यद फरदीन शेख उर्फ दानीश सैय्यद जलील ८) मयुर उर्फ भावेश अभिजीत इंगोले अशी गुन्हेगारी करणारी टोळी असुन ते संघटीतरित्या परिसरात त्याचे टोळीची दहशत पसरविण्यासाठी दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, गैरनिरोध करून दुखापत पोहचविण्याची धमकी देवुन खंडणी मागणे, दुखापत, हमला तसेच गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून गृह अतिक्रमण करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन हमला करणे, गंभीर दुखापत पोहचुन शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे, मौल्यवान वस्तुचे नुकसान करणे, अवैध दारूची विकी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहेत.

सदर संघटितरित्या गुन्हेगारी करणाऱ्या टोळीचा प्रमुख आरोपी नामे आयुष पुरूषोत्तम वावरे हा असुन त्याने पोलीस ठाणे वर्धा शहर, पोलीस ठाणे रामनगर, पोलीस ठाणे सावंगी मेघे परिसरात स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य निर्माण केलेले आहे. आरोपी आयुष पुरूषोत्तम वावरे हा नेहमीच त्याचे टोळीतील साथीदार तसेच त्याचे व्यतिरिक्त आणखी नवनवीन सदस्यांना सोबत घेवुन गुन्हे करीत असतो. टोळीचा प्रमुख आरोपी नामे आयुष पुरूषोत्तम वावरे तसेच त्याचे साथीदार नामे ०१) कोल्हीनुर संजय उके ०२) आकाश उर्फ डुड्डु पुरुषोत्तम पुसदेकर ०३) सौरभउर्फ लाल्या रोजश यादव ४) यश चंद्रशेखर देवगडे, ५) सुदर्शन उर्फ दट्टु सुनील जवादे, ६) सैय्यद फरदीन शेख उर्फ दानीश सैय्यद जलील ७) मयुर उर्फ भावेश अभिजीत इंगोले यांचा इतर कोणताही व्यवसाय नसुन खंडणी वसुली करने, अवैध्य धंदे करून आपली टोळी चालवितात. आयुष वावरे हा आपल्या दशहतीच्या भरवश्यावर त्याचे साथीदाराकडुन गुन्हे करून किंवा साथीदारांकरवी गुन्हे करून हद्दीमध्ये दहशत निर्माण करीत असतो.

वरील आरोपीतांनी संघटीतपणे केलेले एकुण ०७ गुन्हे दाखल असुन त्यांचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर आरोपीतांविरूध्द वारंवार प्रतीबंधक कार्यवाही करूनसुध्दा त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसत नसल्याने पोलीस ठाणे वर्धा शहर अपराध क. १८६१/२०२५ कलम ३०८ (५), ३२४(४), ३२४(६), १८९, ३५१(२), ३५२, भारतीय न्याय संहिता सहकलम १४२ म.पो.का अन्वये दाखल गुन्हयात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, परीक्षेत्र नागपुर यांचे परवानगीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१) (दोन), ३(२), ३(४) समाविष्ठ करून आरोपी नामे १) आयुष पुरूषोत्तम वावरे, वय २२ वर्ष, रा. भीमनगर, ता. जि. वर्धा, २) आकाश उर्फ डुड्डु पुरूषोत्तम पुसदेकर, वय २६ वर्ष, रा. गणेशनगर, ता. जि. वर्धा, ३) कोहीनुर संजय उके, वय २२ वर्ष, रा. इंदिरानगर, सावंगी मेघे, ता. जि. वर्धा, ४) सौरभ उर्फ लाल्या राजेश यादव, वय २२ वर्ष, रा. स्टेशनफैल, ता. जि. वर्धा, ५) सुदर्शन उर्फ दट्टु सुनील जवादे, वय २० वर्ष, रा. स्टेशनफैल, ता. जि. वर्धा, ६) यश चंद्रशेखर देवगडे, वय १९ वर्ष, रा. समतानगर, ता. जि. वर्धा, ७) सैय्यद फरदीन शेख उर्फ दानीश सैय्यद जलील, वय २२ वर्ष, रा. आनंदनगर, ता. जि. वर्धा, ८) मयुर उर्फ भावेश अभिजीत इंगोले, वय २७ वर्ष, रा. गणेशनगर बोरगाव मेघे, ता. जि. वर्धा यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष ताले पो. स्टे. वर्धा (शहर), पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये