ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञातांनी वाहन चोरून नेल्याची तक्रार

बारकाईने तपासणी करीत गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक १३/१/२६ रोजी तकारकर्ता किशोर पांडुरग उरकुडे रा. तडस लेआउट ग्रामपंचाय जवळपिपरी मेघे वर्धा यांचा मालकीचा ट्रक क. एण्मएच-३२ एजे ६३६६ हा १० चारचाकी वाहन कि. ४९,००,०००/- रू हे कोणतीही अज्ञातांचे चोरून नेल्याची तक्रार दिल्यावरून पो.स्टे.ला अप.क. ४४/२६ कलम ३०३(२) बिएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तात्काळ तपासात घेवुन तपास सुरू केला.

सदरहु गुन्हयांचे तपासात यातील फिर्यादीचा नेलेला १० चाकी ट्रक हा कोणी अज्ञांताने चोरून नेला असल्याने कोणतीही संशयती पुरावे/ठसे/निशानी नसतांना आम्ही आमचे अधिनस्त पो.स्टे. ला असलेले पोलीस पथक व आरोपी शोध पथकांना पाचारण करून लागलीच त्या दिवशीच मिळालेल्या माहीतीच्या मागनि रवाना केले सतत ९ दिवस आरोपी शोध पथकांनी कसोशीने प्रयत्न करीत व जिवपाड / अथक प्रयत्न करून तसेच माहीती तंत्रज्ञांनाचा आधारे राज्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्स्थान या राज्यात शोध अंती सदरहु ट्रक हा मध्यप्रदेश राज्यातील अतिग्रम भाग अलीयापुर जिल्हा, पो.स्टे. भाबरा (त. आझाद चंद्रशेखर नगर) ग्राम बोरकरा येथे तपासादरम्यान मिळुन आला, पोलीसाचा मागावा मिळताच सदर गुन्हयांत अज्ञात आरोपी ट्रक सोडुन पळुन गेले व सदरहु ट्रकची मुळ स्थिती अज्ञात आरोपीतांनी बदविल्याने ते माहीती घेत व बारकाईने तपासणी करीत या गुन्हयांतील ट्क निष्प्पन करून, गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरहू गुन्हयांतील ट्रक चोरीबाबत कोणताही सुगावा नसतांना, अधिनस्त पथकातील सपोनि/अंबादास टोपले, पोउपनि अलीम शेख, ग्रे.पो.उपिन/दिनेश कांबळे, पोशि/गजानन मस्के, पोशि/प्रशाद शिंदे, पोशि/विशाल देवकाते, पथकातील पोहवा/योगेश चन्ने, पोशि/राहुल भोयर, पोशि/रूपेश उगेमुगे, पोशि/सचीन पवार, तसेच पथकांतील पोहवा/अवि बन्सोड, पोशि/मुकेश वांदीले, पोशि/विक्की अनेराव, पोशि/मनोज भोमले व स्थानीक गुन्हे शाखेतील सपोनि / आशिषसिंग ठाकुर, पोहवा/नरेन्द्र पाराशर, पोहवा/संजय राठोड, दिपक साठे, मिथुन जिजकार व यातील तात्रीकरित्या माहीती देणारे सायबर सेलचे अमलदार पोशि/गोविदराव मुढे, अक्षय राउत यांनी महत्वाची भुमीका राबवित सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरहू गुन्हयांचा तपास हा मा. पेलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल, सा., मा अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर सा. व स्थनीक गुन्हे शाखेचे पोनि/विनोद चौधरी पो.स्टे. रामनगर ठाणेदार श्री. अजय भुसारी वर्धा यांचे मार्गदर्शनात तपास करून गुन्हयांतील चोरी गेलेल्या ट्रकाचा शोध घेवुन हस्तगत करण्यांत आला आहे. सदर गुन्हयांतील पुढील तपास हा पोउपनि/दिनेश कांबळे व सहकारी ह करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये