ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोयेगाव (मंडल -केरामेरी), जि‌.आसिफाबाद (तेलंगण स्टेट) येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि तेलंगण स्टेट मधील श्रीगुरुदेव सेवा मंडळ गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी,सांगवी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव ( मंडल -केरामेरी), जि‌.आसिफाबाद (तेलंगण स्टेट) येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समितीचे हे २० वे दोन दिवसीय आंतरराज्य संमेलन असून शनिवार दि. ७ फेब्रुवारी व रविवार दि. ८ फेब्रुवारीला गोयेगाव च्या जि.प. शाळेच्या प्रांगणात होणार आहे.

स्थानिक सर्व ग्रामस्थ, भजन मंडळी, युवक, महिला मंडळाच्या सहकार्याने सदर संमेलन होणार असून या संबंधीची महत्त्वाची सभा गोयेगाव येथे नुकतीच संपन्न झाली. साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, विशेष पुरस्कार वितरण, परिसंवाद, प्रबोधन संध्या, खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम, सामुदायिक ध्यान व प्रार्थना, योग प्राणायाम मार्गदर्शन, स्वच्छता अभियान, श्रमदान, अनुभवकथन, समारोप आदी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

          या संमेलनाचे सुक्ष्म नियोजन समितीचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊ पत्रे, चिटणिस ॲड.राजेंद्र जेनेकर, येमाजी गावतुरे, रमेश सोनुले, उपाध्यक्ष ईंजी.विलास उगे, डॉ. श्रावण बानासुरे, श्रीकांत धोटे, संजय वैद्य (वरोरा) समन्वयक पांडुरंग शेंडे, मोतीराम नागोसे, विलास चौधरी, देवराव कोंडेकर, धम्ममित्र नामदेव गेडकर,संयोजक शंकर आदे, नामदेव कुळसंगे, तुळसाबाई गुरनुले, गोविंदराव शेंडे, लिलाबाई आदे,सोमा सोनुले, वामनराव मोहुर्ले, चंद्रकला पारडी, शामलाबाई मोहुर्ले आदी मंडळी करीत आहेत.

संमेलनात राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक, प्रबोधनकार, लोक कलावंत मंडळी, प्रचारक, लेखक सहभागी होणार आहेत.

संमेलन स्थळ गोयेगाव हे के.बी. आसिफाबाद (तेलंगण स्टेट) जिल्ह्यात असून आसिफाबाद – केरामेरी – आदिलाबाद या मार्गावर आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये